Ad will apear here
Next
नागवेल
‘नागवेल’ ही कादंबरी म्हणजे ज्ञानेश्वर नावाच्या एका हुशार तरुणाची गोष्ट आहे. खूप अभ्यास करून नाव कमवायचे आणि मराठी साहित्याची आवड जोपासायची, अशी त्याची इच्छा असते; पण रोजीरोटीसाठी त्याला त्याच्या भावोजींना मदत करावी लागते आणि त्यासाठी त्याला पानवाला बनावे लागते.

दारिद्र्याचे दशावतार तो पाहत/भोगत असतो; त्यातून बाहेर पडून एका चांगल्या संस्थेत उत्तम वेतन असलेला प्राध्यापक बनायचे स्वप्न तो नेहमी पाहत असे. त्याच्यासारख्याच अत्यंत गरीब तरुणांच्या आयुष्यात बदल घडवायची आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देण्याची त्याची इच्छा होती. ही कल्पना त्याला कॉलेजमधील त्याचे लाडके प्राध्यापक सोनटक्के यांच्याकडे पाहून सुचली होती. प्रा. सोनटक्के यांची शिकवण्याची पद्धत अशी होती, की सगळे विद्यार्थी अगदी मंत्रमुग्ध होऊन जात. ज्ञानेश्वरच्या जीवनात त्यांचे स्थान महत्त्वाचे होते.

तशीच आणखी एक व्यक्तीही ज्ञानेश्वरच्या आयुष्यात विशेष महत्त्वाची होती, ती म्हणजे सविता - त्याचे प्रेम. कॉलेजमध्ये असताना सविता त्याच्या वर्गात होती. त्यांची अनेक वर्षांची मैत्री खुलत जाऊन तिचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले होते; पण ही कादंबरी म्हणजे प्रेमकथा नाही. ही अशा एका मुलाच्या संघर्षाची गोष्ट आहे, की जो अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत असूनही तो खूप मोठा होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करत होता. सध्याची शिक्षणव्यवस्था भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीने ग्रासलेली आहे. अशा स्थितीतही तो स्वतःचे स्वतंत्र स्थान मिळवण्यासाठी झगडत होता. 

त्याने सुवर्णपदक मिळविले होते; पण त्याच्या खिशात दमडीही नव्हती. अशा स्थितीत पाच हजार रुपये मानधनाच्या पुढे त्याची प्रगती होईल का? दोघांच्या आर्थिक परिस्थितीत असलेली प्रचंड दरी पाहता तो सविताशी लग्न करू शकेल का? त्याचे मित्र हा नेहमीच त्याचा मोठा आधारस्तंभ होता; पण असे आणखी कोणी होते का, की जे त्याचा हा संघर्ष/धडपड पाहत होते आणि त्याला मदत करू इच्छित होते? तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो का? की त्याला पुन्हा पानवालाच बनावे लागते? या प्रश्नांच्या उत्तरासाठी ‘नागवेल’ ही कादंबरी वाचायलाच हवी. 

प्रा. नवनीत देशमुख यांची ‘नागवेल’ ही कादंबरी वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ही कादंबरी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर ती वाचकांच्या मनाला हात घालणारी आणि स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारी गोष्ट आहे.

पुस्तक : नागवेल
लेखक : नवनीत देशमुख
प्रकाशक : नमिता ग्रंथ वितरण, वर्धा
पाने : ३१४
किंमत : ४२५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVLBX
Similar Posts
नोबेल विजेता विनोद मोहिते आणि त्याची प्रेयसी विशाखा आपटे या दोघांभोवती फिरणारी ही उत्तम कदम यांची कादंबरी आहे. कादंबरीच्या प्रारंभीच वधस्तंभाकडे जाणारा धीरोदात्त नायक विनोद मोहिते समोर येतो मात्र, चमत्कार घडावा तशी त्याची फाशीची शिक्षा रद्द होते. फाशी रद्द होण्याचे कारण काय, मुळात त्याला फाशीची शिक्षा होण्याचे कारण काय, या सगळ्याची उत्तरे कादंबरीतून मिळतात
भेद्य अभेद्य उषा पुरोहित यांची ही सामाजिक कादंबरी आहे. शहरी मध्यमवर्गीय संस्कृती, जीवन कादंबरीतून समोर येते. स्वातंत्र्यपूर्व आणि तत्कालिक स्वातंत्र्योत्तर काळही दिसतो. ‘भेद्य आहेत त्या माणसा-माणसांमध्ये उभ्या केलेल्या भिंती आणि अभेद्य आहेत त्या त्या समाजपुरुषाला कुटिलतेने अपमानित करणाऱ्या विषप्रवृत्ती’, असे लेखिका प्रस्तावनेत म्हणतात
यसन ‘यसन’ म्हणजे बैलाच्या नाकात घातलेली दोरी. याचे नियंत्रण गाडीवानाकडे असते. अशा अनेक ‘यसनी’ माणसाच्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असतात. यामुळे त्याचे जीवन कचाट्यात सापडते, असे कथन करीत ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांनी ‘यसन’ या कादंबरीतून ऊसतोडणी मजुरांचे ‘जीणं’ उभे केले आहे.
अत्यंत उत्कंठावर्धक, कॉर्पोरेट जगातील शह-प्रतिशह ह्यांची थरारक कहाणी सांगणारे पुस्तक 'गोमूचा नाच' आपले काम पार पडत असताना कामगार आणि मॅनेजमेंट दोघांचा फायदा व्हावा, लोकांमधला आत्मविश्वास वाढून त्यांना त्यांच्यातील कौशल्यांची जाणीव व्हावी, एक उमदे व्यक्तिमत्त्व घडावे म्हणून सातत्याने केलेले प्रयत्न. हा सगळा प्रवास, ह्या घडामोडी वाचणे अत्यंत रंजक आहे, विचारप्रवृत्त करणारे आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language